माणदेशी बँकेची बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार - रेखा कुलकर्णी
म्हसवड -
माणदेशी बँकेची नाहक बदनामी करणाऱ्यावर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.रेखा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भारतीय रिझर्व्ह बँकेने फक्त येस बँकेवरती आथिँक निर्बंध घातले आहेत या बँके व्यतिरिक्त माणदेशी महिला बँकेसह इतर कोणत्याही सहकारी बँकेवरती निर्बंध घातलेले नाहीत. अशी वस्तुस्थिती असताना व्हट्सएप सोशल मिडीयावरती १०९ बँकांच्या नावाचा समावेश असलेल्या यादीचा मेसेज अज्ञाताकडून जाणीवपूर्वक पसरवण्यात येत आहे.
तो पूर्णपणे चुकीचा असून बँकेला नाहक बदनामी करणारा असल्यामुळे संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे.माणदेशी महिला बँक आथिँक सक्षम असून बँकेच्या ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन या बँकेचे अध्यक्ष श्रीमती चेतना सिन्हा व बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
माणदेशी महिला बँकेच्या एकूण आठ शाखा असून या सर्व शाखांमधील ग्राहकांच्या ठेवी सुरक्षित असून बँके मार्फत विविध व्यवसायिकांना वाटप केलेल्या कर्जाच्या वसुलीचे प्रमाण समाधानकारक असे आहे. सन २०१७/१८ या आर्थिक वर्षात थकीत कर्जाची टक्केवारी (NPA) २.०५ टक्के, व १०१८/१९ आथिँक वर्षातील थकीत कर्ज त्याहून कमी १.७२ टक्के इतकी नाममात्र आहे तर चालू आथिँक वर्षात माणदेशी महिला बँकेत ग्राहकांच्या ठेवीत वाढ झाली असून कर्ज वसुलीचीही टक्केवारी समाधानकारक आहे. माणदेशी महिला बँकेचा प्रगती पथाचा आलेख दिवसेंदिवस वाढता आहे.हि बँक सामान्य , कष्टकरी महिलांसभासदांची बँक असून सभासद ग्राहक व ठेवीदार यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नाही .अशी ग्वाही श्रीमती चेतना सिन्हा यांनी दिली. त्यापुढे त्या म्हणाल्या की बँके चा अफवा विषयी चे निवेदन जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख सातारा यांना देण्यात आले आहे अशी माहिती माणदेशी महिला बँकेच्या अध्यक्षा श्रीमती सिन्हा व व्यवस्थापक सौ रेखा कुलकर्णी यांनी दिली.