सातारा - अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना होमिओपॅथिक औषधांचे कीट शिवविजय प्रतिष्ठान तर्फे मोफत देण्यात आले आहे.
देशभर कोरोणाचे संकट दिवसेंदिवस अधिक वाढत आहे या कोरोणाचे उच्चाटन करण्यासाठी प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. मात्र यावर अद्याप उपाय निघाला नसल्यामुळे लोक हवालदिल झाले आहेत.
आयुष मंत्रालयाने होमिओपॅथीची औषधे यासाठी प्रभावी असल्याचे मत व्यक्त केले आहे. हा आजार होऊ नये व आजारांमधील संभाव्य धोके टाळावेत. यासाठी होमिओपॅथी औषध अधिक प्रभावी आहे. असे निदर्शनास येत आहे.
यामुळे शिवविजय प्रतिष्ठान ,भाटमरळी यांनी होमिओपॅथी औषधांचे कीट अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या सर्व कर्मचाऱ्यांना मोफत भेट दिली.
सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी संजय देसाई यांच्या उपस्थितीत दिले.
शिवविजय प्रतिष्ठान चे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण, भाटमरळी यांनी दिली.
लॉकडाऊन नंतर शेंद्रे परिसरातील नागरिकांना आधार कार्ड पाहून सातारा येथील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये मोफत या औषधाचे वाटप येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संजय देसाई यांनी उपस्थित सर्वाचे आभार मानले.