राष्ट्रवादी काँग्रेस आटपाडी तालुका युवक अध्यक्षपदी सुरज पाटील यांची निवड 

 


 


आटपाडी .( प्रतिनिधी ) 
राष्ट्रवादी कॉंग्रेस आटपाडी तालुका युवक अध्यक्षपदी सुरज रावसाहेबकाका पाटील यांची निवड झाल्याचे पत्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी सांगली पक्ष कार्यालयात दिले .
             राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नुतन जिल्हाध्यक्ष अविनाशकाका पाटील , कार्याध्यक्ष अॅड . बाबुराव मुळीक , जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील ,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भरत देशमुख , प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी , जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे , युवती कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा पुजा लाड , कार्यालयीन सचिव मनोज भिसे इत्यादी मान्यवरांचे उपस्थितीत निवडीचे पत्र सुरज पाटील यांना प्रदान करण्यात आले . 
              आटपाडी येथे सुरज पाटील यांचे आगमन होताच फटाके , ढोल ,ताशांच्या गजरात घोषणा देत जोरदार स्वागत करण्यात आले . सत्काराच्या कार्यकमात सुरज पाटील यांचे अभिनंदन करणारी सर्वश्री . रावसाहेबकाका पाटील , सादिक खाटीक ,सुभाष माने सर , किशोर गायकवाड , सुहास लांडगे , संभाजीराव पाटील , वाय . डी .सरक सर , गणेश ऐवळे सर इत्यादींची भाषणे झाली . शिवसेनेचे युवक तालुका प्रमुख संतोष पुजारी , ग्रा पं . सदस्य राजेंद्र बालटे , कामथचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील , सर्जेराव राक्षे  सौ .जया रेड्डी , तानाजी पाटील , बाळासाहेब गायकवाड , अजय गायकवाड , आलम कांबळे , विशाल गायकवाड , श्रीकांत गायकवाड  , रमेश पवार , अमित पाटील , दत्ता रावळ , दत्ता पाटील , नितीन डांगे ओंकार चव्हाण , श्रीनिवास 
 सपाटे इत्यादी अनेकांनी सुरज पाटील यांचा सत्कार केला . 
               राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमचे दैवत ना . जयंतराव पाटील यांच्या आशीर्वादाने आणि पक्षाचे जिल्हा , तालुका श्रेष्टींच्या मार्गदर्शनाखाली आटपाडी तालुक्यात युवकांचे मजबूत संघटन करण्याचा माझा प्रयत्न असेल , समाजातील सर्व घटकांना सामावून घेत त्यांच्यासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचे मत आपल्या सत्काराला उत्तर देताना नुतन युवक अध्यक्ष सुरज पाटील यांनी व्यक्त केले .
              समाजहितासाठी मोठी ताकद ठरणारी आमदारकी मला ४५ वर्षात मिळवता आली नाही हे शल्य लवकरच पुसले जाईल असे आशादायक वातावरण असल्याची भावना राष्ट्रवादीचे ज्येष्ट नेते रावसाहेब काका पाटील यांनी बोलून दाखविली  .
              आटपाडी तालुक्यातील प्रत्येक गाव ,वाडया ,वस्त्यावर राष्ट्रवादीचा विचार आणि उंची वाढविणारी युवकांची फौज निर्माण करून सर्व सामान्यांच्यात  विश्वास निर्माण करण्यात यशस्वी होणे हेच या पदाला न्याय देणारी कृती ठरू शकेल असे मत सामाजीक कार्यकर्ते सादिक खाटीक यांनी यावेळी व्यक्त केले .