शिंगणापूर घाटात प्रवासी जीपवर दरोडा
शिंगणापूर -वृतसेवा:
शिखर शिंगणापुर तालुका माण जवळील कोथळे तालुका माळशिरस गटामध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास चारचाकी क्रुझर गाडी अडवून प्रवाशांना मारहाण करून अज्ञात सहा जणांच्या टोळक्याने एक लाख रुपयांच्या वर सोन्याचे दागिने पैसे मोबाईल लुटून दरोडा घातल्याची फिर्याद चैतन्य सखाराम बडूरे यांनी नातेपुते पोलीस स्टेशनला दिलेली आहे.
शिखर शिंगणापूर कोथळे घाटात अज्ञात चोरट्यांनी प्रवाशा वर दरोडा टाकून प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लुटून नेल्याचा प्रकार वारंवार घडत आहेत.
जीप गाडीचे ड्रायव्हर चैतन्य बडोले यांनी फिर्यादीत म्हटले आहे,जीपने आम्ही जेजुरी निरा फलटण मार्गे शिंगणापूर येथे देवदर्शनाला जात असताना कोथळे घाटामध्ये रात्री साडे दहा ते अकराच्या सुमारास घाटात आमच्या गाडी चा पाठलाग तीन मोटारसायकलीने केला. आम्हाला पास करून आमची गाडी अडवली व त्या गाडीतील प्रवाशांकडून सोन्याचे दागिने, रोकड असा एक लाख पाच हजार सहाशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
याबाबत नातेपुते पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
अधिक तपास सुरू आहे.