नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्र संघटनेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर


वडूज :प्रतिनिधी -


 जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या जिल्हा कार्याध्यक्ष पदी डॉ विनोद खाडे तर विनोद कुलकर्णी


उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.तर सचिव पदी
दै प्रभात चे प्रकाश राजे घाडगे, कोषाध्यक्ष पदी गणेश बो तालजी यांची निवड झाली आहे.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र च्या सातारा
जिल्हा कार्यकारिणी सदस्य बैठक खटाव तालुक्यातील तीर्थक्षेत्र पुसेगाव या ठिकाणी संपन्न झाली. प्रारंभी येथील
संत सेवागिरी देवस्थान ट्रस्ट व एन यु जे एम जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचे वतीने नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट, महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचं स्वागत करण्यात आले.यावेळी सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती प पू सुंदर गिरी महाराज यांचे हस्ते राज्य अध्यक्षा शीतल ताई करदेकर यांचा देवस्थानचे महावस्त्र, पुष्पहार, श्रीफळ देवुन यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी देवस्थान चे चेअरमन मोहन जाधव,विश्वस्त व राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, विश्वस्त सुरेशशेठ जाधव , विशाल माने,आदींची उपस्थिती होती."नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट महाराष्ट्र
ही संघटना "नॅशनल जर्नालिस्ट ऑफ इंडिया, दिल्ली"या राष्ट्रीय संघटनेशी संलग्न असून इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ
जर्नालिस्ट, ब्रुसेल्स ची सदस्य आहे" असं सांगून शीतल करदेकर यांनी "ही संघटना केवळ पत्रकार संघटना नसून, समाजातील प्रत्येक पत्रकारासाठी संरक्षण, आरोग्य विषयक अडचणी, कौटुंबिक प्रश्न,कार्यालयीन प्रश्न,आदी बाबीवर काम करणारी संघटना आहे. प्रत्येक पत्रकार
हा सुरक्षित व भयमुक्त आणि सन्मान्य जीवन जगला पाहिजे, यासाठी नेहमीच प्रयत्नशील असणारी ही संघटना आहे"असं ही शीतल करदेकर यांनी या वेळी सांगितले."सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या माध्यमातून पत्रकारांसाठी मेडिक्लेम, वैद्यकीय उपचार मदती विषयी काही सुविधा दिल्या जाव्यात, असंही शीतल करदेकर म्हणाल्या. यावर देवस्थान चे मठाधिपती प पू सुंदरगिरी महाराज व विश्वस्त डॉ सुरेश जाधव आदींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली.
दै सोलापूर तरुण भारत चे विशेष प्रतिनिधी व एन टी व्ही न्युज मराठी चे सातारा प्रतिनिधी डॉ विनोद खाडे यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली, तर दै सोलापूर तरुण भारत चे सातारा आवृत्ती संपादक विनोद कुलकर्णी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.दै प्रभात ,बुध चे प्रतिनिधी प्रकाश राजेघाटगे यांची जिल्हा सचिव पदी,तर कोरेगाव येथील साप्ताहिक सह्याद्री वेध चे संपादक गणेश बोताल जी यांची कोषाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून साप्ताहिक माणदेशी न्यूज चे संपादक विजय टाकणे, दै लोकमत चे लोणंद प्रतिनिधी
संतोष खरात,दै लोकमत चे म्हसवड प्रतिनिधी सचिन मंगरुळे, दै सोलापूर तरुण भारत,पाटण प्रतिनिधी अरविंद
जाधव,दै सत्यसह्याद्री चे फलटण प्रतिनिधी विक्रम चोरमले
यांच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
या निवडी राज्य
अध्यक्षा शीतल करदेकर यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या  असून यावेळी एनयुजेएम सातारा जिल्हा अध्यक्ष रूपेश कदम(दै सकाळ)लालासाहेब दडस( तरुण भारत),प्रकाश सुरमुख,(दै पुण्यनगरी)
महेश तांबवेकर,(लोकप्रवाह न्यूज) संदीप कुंभार,(दै लोकमत) किरण देशमुख(दै प्रभात) मुन्ना मुल्ला(ऐक्य) जे के काळे ( दै सत्यसह्याद्री) संतोष सुतार(महाराष्ट्र न्यूज) दिलीप वाघमारे
(टी व्ही 1) सुनील पाटे(सा सह्याद्री वेध) आदींची उपस्थिती होती.
एनयुजेएम चे मार्गदर्शक मा शिवेंद्रकुमारजी यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या आहेत