पत्रकार, पोलीस यांचे कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न

मायणी परिसरात  पोलीस  पोलीस पाटील व पत्रकार करुणा विरुद्धच्या लढ्यात सहभागी .
मायणी दि. २३ प्रतिनिधी
 कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मायणी व परिसरात पोलिस व आरोग्य यंत्रणा हाय अलर्ट झाली असून पुणे ,मुंबई व परराज्यातून गावाकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ असून त्याबाबतीत आरोग्य विभागाने दक्ष राहणे गरजेचे आहे. या लढ्यात पोलीस पोलीस पाटील व पत्रकार हेदेखील सहभागी होऊन कोराणाला हद्दपार करण्यासाठी सुसज्ज झाले आहेत.
               आज सर्वत्र कोरोणाने धुमाकूळ घातला असल्याने शासकीय पातळीवर विविध यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत झाल्या आहेत. रविवारी आयोजित जनता कर्फ्यूला मायनी पोलीस दूरक्षेत्रांत्तर्गत असलेल्या गावांमधील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .जनता कर्फ्यू च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मायणी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी, मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी व मायणी पत्रकार संघातील सर्व सदस्यांनी सकाळी आठ ते सायंकाळी आठ पर्यंत प्रत्येक गावात जाऊन विशेष परिश्रम घेतले.
यावेळी मिळालेल्या माहितीनुसार  मायणी व परिसरातील सुमारे २०-२१ गावांमध्ये पुणे, मुंबई व परराज्यातून अनेक नागरिक आपल्या मूळगावी परतू लागले आहेत .त्यातील काही जणांनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली असली तरी मोठ्या प्रमाणावर परगावाहून आलेल्या नागरिकांची तपासणी न झाल्यामुळे या भागातील नागरिकांनी  कोरोणा संदर्भात अत्यंत गांभीर्याने काळजी घेणे गरजेचे आहे. मायणी प्राथमिक आरोग्य केंद्र ,तसेच कलेढोण येथील कुटीर रुग्णालय व पडळ, चितळी आदी उपकेंद्रे वप्राथमिक केंद्रामध्ये सर्व आरोग्य कर्मचारी काळजी घेताना दिसत आहेत . पोलीस पाटील, ग्रामपंचायत,अंगणवाडी सेविका व आशा सेविका  यांच्यामार्फत  गावामध्ये  नवीन आलेल्या नागरिकांची माहिती घेऊन  ती प्राथमिक आरोग्य केंद्रास कळवली जात असून  त्यांच्यामार्फत या नवीन आलेल्या  आपल्या नागरिकांना तपासणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यास  प्रवृत्त केले जात आहे.  १४४ कलम जाहीर झाल्यामुळे यासंदर्भातही पोलीस विभागामार्फत खबरदारी घेतली जात असून नागरिकांना बाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आजही या भागातील बहुतांश गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यवहार बंद असल्याचे दिसून येत आहे. भाजीपाला विक्रेते सकाळी आठ ते चार, किराणा माल विक्रेते  दुपारी १२ ते२व अत्यावश्यक सेवा पूर्णवेळ चालू ठेवल्याने नागरिकांची कोणतीही गैरसोयहोत नसल्याने नागरिकांचाही त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.