"म्हसवड शहर संपूर्ण बंद, जनता कर्फ्यू ला १०० % प्रतिसाद
म्हसवड:-
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यामुळे जनतेने आज दिनांक 22 रोजी सर्व व्यवहार बंद करुन जनता कर्फ्यु साजरा केला.
म्हसवड शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद करून या जनता कर्फ्यू मध्ये सहभाग घेतला परिसरातील भाजी मंडई, रथ मार्ग मुख्य बाजारपेठ शहरातील सर्व परिसरातील लोकांनी स्वतःला घरामध्ये बंद करून आपले सर्व व्यवहार आज बंद ठेवले होते.
कोरना य महाभयंकर अशा विषाणू ला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एक दिवस स्वतःला घरात बंद करून जनता कर्फ्यू सादर साजरा करावा असे आवाहन केले होते .
या आवाहनाला म्हसवड येथील नागरिक आणि उत्तम प्रतिसाद दिला आणि शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री 9 पर्यंत स्वतःहून हा कर्फ्यू पाळणा होता
म्हसवड नगरपालिका प्रशासन ,म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलिस स्टेशन यांनी लोकांची जनजागृती करून लोकांना शट डाऊन करण्यासाठी आवाहन केले.
म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, नगराध्यक्ष तुषार विरकर,उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण कोडलकर यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.कोरोनाला रोखण्यासाठी लोकांनी सहकार्य केल्याबद्दल म्हसवड पोलीस स्टेशन तर्फे शहरातून लोकांचे आभार मानण्यासाठी मोटारसायकल वरून फेरी काढली होती.