आरोग्यसाक्षरता निर्माण व्हावी यासाठी इंडियन मेडिकल असोशिएशन महाराष्ट्र चे आवाहन 

आरोग्यसाक्षरता निर्माण व्हावी यासाठी इंडियन मेडिकल असोशिएशन महाराष्ट्र चे आवाहन


जयसिंगपुर : -


इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य सर्व भारतीय नागरिकांना आवाहन करत आहे की, 
महाराष्ट्रातील कोणत्याही गावात अथवा शहरातील कोणत्याही व्यक्तीला असा संभ्रमित करणारा, भीती दाखवणारा किंवा तथाकथित शास्त्रीय किंवा पारंपारिक उपाय सुचवणारा संदेश कोणत्याही समाजप्रसार माध्यमात (सोशल मिडियामध्ये) आढळून आला, तर त्याने तो अन्य कोणालाही पाठवण्याऐवजी, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ९८२३०८७५६१ या व्हॉट्सअॅप नंबरवर पाठवावा. (फॉरवर्ड करावा.) अथवा आपल्या नजीकच्या आयएमए शाखेला पाठवावा.


सदर संदेशाचे आमच्या आयएमएमधील तज्ञ डॉक्टरांकडून त्वरित विश्लेषण केले जाईल ,आणि त्याची सत्यता सांगणारा संदेश त्या व्यक्तीला त्वरित उत्तर म्हणून पाठवला जाईल. 
 अशा प्रकारचा संदेश जर खूप गैरसमज आणि भीतीदायक वातावरण पसरवणारा असेल तर सदर संदेश मूलतः पाठवणाऱ्या व्यक्तीविरुद्ध सायबर क्राईम अंतर्गत पोलीस तक्रार केली जाईल.


डॉ. अविनाश भोंडवे
अध्यक्ष,
आयएमए महाराष्ट्र राज्य


महाराष्ट्रातील जनतेचे आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांच्यात आरोग्यसाक्षरता निर्माण व्हावी म्हणून आयएमए महाराष्ट्र राज्य कटिबद्ध आहे. 
सदर मोहीम हा डॉक्टरांच्या सामाजिक जबाबदारीचाच एक भाग आहे.