क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यशाळा संपन्न
म्हसवड:-
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात हात धुण्याचे प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न झाली.
कोरोना व्हायरस चा होणारा संसर्ग रोखण्यासाठी संकुलातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरस संबधित सावधगिरी व खबरदारी उपाय म्हणून साबणाने हात धुणे,सॅनिटायझरचा उपयोग करणे,स्वछता राखणे,शिंकताना तोंडावर रुमाल अथवा मास्कचा उपयोग करणे अशी विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना करून दाखविण्यात आली.यावेळी संकुलातील क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा,आत्मगिरी विद्यालय,क्रांतिवीर ज्यू कॉलेज,क्रांतिवीर इंग्लिश मिडीयम, नूतन प्राथमिक शाळा,सिध्दनाथ बालक मंदिर या विविध शाखेतील सर्व विद्यार्थ्यांना कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधांत्मक उपाययोजनेच्या संबधित प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात आहे.
यावेळी संस्था अध्यक्ष प्रा.विश्वंभर बाबर,संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,सुभद्रा पिसे,मुख्याध्यापक अनिल माने,अनुरूप के के,प्राचार्य विठ्ठल लवटे,तसेच संकुलातील सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.
क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कार्यशाळा संपन्न