पुण्यातील दुकाने ३ दिवस बंद ठेणार. गार्डन्स अनिश्चित काळासाठी बंद.

पुण्यातील दुकाने ३ दिवस बंद ठेणार.
गार्डन्स अनिश्चित काळासाठी बंद


पुणे : प्रतिनिधी-
 दरम्यान, पुण्यातील कोरोना व्हायरसचा फैलाव हा दुसऱ्या टप्प्यावर आहे. त्यामुळे प्रशासन अधिक सतर्क झालं आहे. पुण्यातील दुकाने ३ दिवस बंद ठेणार असल्याचे व्यापारी संघटनेने जाहीर केले आहे, जीवनावश्यक वस्तूंची  दुकाने मात्र सुरू राहणार आहेत .


पिंपरी चिंचवडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. पुण्यातही १४४ कलम लागू करण्यात येणार आहे.


 पण यात संचार बंदी नसेल, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. 
तसंच ज्या खासगी कंपन्यांना शक्य आहे त्या कंपन्यांनी कामगारांना वर्क फ्रॉम होम देण्याचे, आदेश देण्यात आले आहेत.


 कोरोना व्हायरसने भारतात प्रवेश केला असून महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३९ वर गेली आहे. यापैकी सर्वाधिक १६ रुग्ण पुण्यात आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी महापालिकेची सर्व गार्डन्स बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना जंतूचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातली २०२ गार्डन्स अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यत पूर्ण वेळ गार्डन्स बंद ठेवण्यात येणार आहेत.