कोल्हापूर -
पन्हाळा रोडवरील वाघबीळ घाटातुन सुमारे तीस फूट खोल दरीत वाघबीळ घाटात कार दरीत गेल्याने या अपघातात पाच जण जखमी झाले.हा अपघात दुपारी दोनच्या सुमारास झाला.
या अपघातातील जखमींना सीपीआरमध्ये दाखल केले. या अपघातात जखमी झालेल्याची नावे बाबासाहेब धोंडीराम आगलावे (वय 30), आक्काताई दगडू पाटील (वय 45, दोघे रा. आंबर्डे, शाहूवाडी), अमर आदित्य चव्हाण (वय 17), दीपाली आदित्य चव्हाण (वय 34), आदित्य भीमराव चव्हाण (वय 38, रा. साठरे बांबर, जिल्हा रत्नागिरी) अशी आहेत. याची नोंद सीपीआर चौकीत झाली आहे.
पन्हाळा घाटात कार दरीत कोसळली... पाच जण जखमी...