"मयूर गुरव याचा प्राण वाचविल्याबद्दल
दहिवड़ी पोलिस स्टेशन तर्फे भोसले, मुळे यांचा सत्कार"
दहिवड़ी-प्रतिनिधी -
महाशिवरात्रि चे दरमयान वावरहिरे येथील शंभु डोहामधे मयुर गुरव 28 वयाचा तरुण पाणलिंग मंदिरा साठी पुजेला कळशी ने 11 घागरी पाणी घालण्याचे काम परंपरेने अंघोळ करूनच प्रत्येक घागर घेऊन जात होता.मंदिर ते डोह 1km आंतर असताना 5वी घागर अंघोळ करून पाणी भरलेली कळशी नेताना अचानक तो खोल पाण्यात बुडाला त्याला पोहता येत नव्हते.त्यास एका बाईने सौ.सविता धोत्रे यांनी पाहिले तिने आरडा ओरड केल्याने शुभम भोसले व राजू मुळे आले,नंतर लोक गर्दी जमा झाली. त्यावेळी डोहतील पानी शान्त झालेले पाहून गर्दी पोलीस पंचनामा भीतीने पांगली पण शुभम भोंसले ने मुलगा बुडल्याचे समजताच जीवाची परवा न करत्ता कपड्या निशी किशात मोबाईल असतानाही काहीच विचार न करता लगेच उडि मारली पण त्याला तो मयुर सपड़ला नाही ,पुन्हा बुडी मारली मग मयुर सापड़ला तो 25 ,30 पुट खोल पाण्यात निपचित पडलेला होता ,शुभमने पायला पकडून कमी पाण्याचे बाजूने बाहेर काढले , मयूर ला बाहेर आणले वर राजू मुळे यांनी पोटातील थोड़े पाणी काढून आणि काही निरगोपचार करून त्याला शुद्धिवर आणले हा प्रसंग 7मिनिट घडले पण थोडे 1 मिनिट विलंब होता तर वाईट घडले असते,सौ.सविता धोत्रे यांनी देखील त्या वस्तीवर पाहुणे म्हणून आले असता देखील घरातून साडी आणून मयूर च्या दिशेनं फेकून सुरवातीला प्रयत्न केला होता हे देखील महिलेचे काम धाडसाचे होते.शुभम ने हे धाडस केले नंतर तो दोन दिवस सर्दी तापाने आजारी पडला होता तसेच त्यानंतर त्याने 12 वि चे काही पेपर दिले .आज च शेवटचा पेपर झाल्याने त्याचा 7 फेब्रुवारी2020 रोजी रात्री 8 वाजता
वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांचे शुभहस्ते शुभम भोसले,राजू मुळे यांचा दहिवडी पोलीस स्टेशन तर्फे हार गुच्छ ,फेटा बांधून फुले,शाहू, आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा व पुस्तकसंच भेट दिले
या वेळी भुजबळ साहेब म्हणाले की एक जीव वाचवून शुभम ने अलौकिक असे कार्य करून मोठे धाडस दाखविले आहे ,आज च्या तरुणाने अभ्यास तर चांगला केलाच पाहिजे पण सोबत पोहणे हे प्रत्येकालाच आले पाहिजे त्याने शरीर पण लवचिक , निरोगी रहाण्यास मदत होते.आणि असे सत्कार लक्षात ठेवून जिद्धीने मोठे व्हा समाजसेवा करा असा मौलिक सल्ला पण दिला.सत्काराचे आयोजन रघुनाथ ढोक,अध्यक्ष फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन ने केले होते या वेळी तुळशीराम यादव,अमित ढोक,तेजस ढोपे व पोलीस स्टेशनचे कर्मचारी,अधिकारी उपस्थित होते.