आटपाडी ( प्रतिनिधी )
पुणे येथील ओबीसी फौंउडेशन इंडिया व स्वाती मोराळे संखी मंच याच्यावतीने आटपाडी तालुक्यातील शिक्षिका मा . सौ .कविता घाडगे यांना रणरागिणी नॅशनल अवॉर्डने गौरविण्यात आले .त्या आटपाडीतील डायनँमिक इंग्लीश मिडीयमच्या शिक्षिका आहेत.
कविता घाडगे या शिक्षिका असून सुद्धा त्यांनी अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केले आहे , त्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.उत्कृष्ट शिक्षिका म्हनुन त्यांचे आटपाडी मध्ये नाव आहे.आटपाडी एजूकेशन सोसायटीचा डायनँमिक इंग्लीश मिडीयम मध्ये गेली काही वर्षे कार्यरत आहेत.
समाजासाठी आपण सौज्वळपणे जे करू तेवढे समाज आपल्याला परत देतो याची प्रचिती आल्याचे ते प्रतिनिधीशी बोलताना म्हणाल्या.
वेगवेगल्या उपक्रमांतून आटपाडीमधील महिलांचे बरोबर त्यांनी उत्कृष्ट कार्य केले आहे.या सर्व कामाची सामाजिक बांधिलकी असलेल्या ओबीसी फाउंडेशन ने दखल घेऊन सौ . घाडगे यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलाचा गुणगौरव सोहळा येरवडा पुणे येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे रंगमंदिर येथे पार पडला .
यावेळी सहाय्यक पोलिस आयुक्त रविद्र शिसवे,माजी आमदार गोविंद केंद्रे,पोलिस उपायुक्त विनायक ढाकणे,पोलिस अधिक्षक बजरंग बनसोडे,पोलिस अधिक्षक प्रकाश गायकवाड,राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर,आमदार नरेंद्र दराडे,माजी आमदार प्रकाशआण्णा शेंडगे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
आटपाडीच्या सौ. कविता घाडगे रणरागिणी नॅशनल अॅवार्डने सन्मानीत