पत्रकार एल.के. सरतापे यांचे कार्य नवोदित पत्रकारांना प्रेरणादायी आहे."

"पत्रकार एल.के. सरतापे यांचे कार्य नवोदित पत्रकारांना प्रेरणादायी आहे.


म्हसवड: प्रतिनिधी:
म्हसवड येथील पत्रकार एल.के. सरतापे यांचे कार्य नवोदित पत्रकारांना प्रेरणादायी आहे.असे विचार सौ. स्वाती ताई मोराळे यांनी व्यक्त केले.



  • सांगोला येथील दै.तुफान क्रांती या दैनिकाच्या वतीने सरतापे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी त्या  बोलत होत्या.


चतुर्थश्रेणी पदावर काम करत जनसामान्यासाठी व लोक हिताची पत्रकारीता जोपासत   नागरी प्रश्नावर आवाज उठवत लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडूण्या बरोबर माणदेशातील शेतीच्या पाणी , बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी औद्योगिक वसाहत उभी रहावी व तरुणांच्या हाताला काम उपलब्ध करण्यासाठी, भटक्या समाजाला रेशनिंग कार्ड,आधार, मतदान ओळख पत्र मिळवून देत पालिका, महसुल, पोलिस , विज मंडळ, रस्ते , वृक्षतोड आदी विभागावर पत्रकारीतेतुन अंकुश ठेवण्याचे उल्लेखनिय कामगिरी करणारे जेष्ठ पत्रकार एल के सरतापे यांना निर्भिड आदर्श सेवा सन्मान या पुरस्काराने  गौरव म्हणजे माणदेशाच्या मातीतील गौरव असल्याचे ओबीसी फाउंडेशन व सखी मंच पूणे अध्यक्षा स्वातीताई मोराळे यांनी या पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केले.
     सोलापुर जिल्ह्यातील सांगोला या माणदेशातील ओसाड भागातील पाणी रोजगार शेतीसह मानवतेच्या भावनेतुन दोन वर्षात पत्रकारीतेच्या माध्यमातुन  निर्भिड असे तुफान क्रांती या दैनिकाचे संपादक मिर्झागालिब मुजावर यांनी सुरवात केली.
या दैनिकांच्या दुसरा वर्धापन व महिला दिना निमित्त माणदेशातील सामाजिक , शैक्षणिक, उद्दोग, व्यावसायिक, अधिकारी व पत्रकार या कतृत्वान महिला पुरुषांचा निर्भाड आदर्श सेवा सन्मान पुरस्कार  ओ. बी.सी. फौंउंडेशन इंडियाच्या अध्यक्षा स्वातीताई मोराळे तुफान क्रांतीचे संपादक मिर्झागालिब मुजावर ,बापूराव नामदास ,राहुल खरात पिंकी परदेशी, अश्विनी वाकळे , डॉ जयदिप झरेकर, सौ व श्री मुजावर , डॉ चंद्रकांत सांबळे, पत्रकार सदाशिवरव  पुकळे,धिरज खर्जे,चित्रपट दिग्दर्शक भरत चव्हाण, उत्तम बालटे, श्रषीकेश सांळुखे, शैला वायभसे, आंबेडकर चळवळीचे अभ्यासक प्रथा डॉ रामदास नाईकनवरे,बळीराजा शेतकरी संघटनेचे अजित बोरकर पत्रकार नागेश डोंबे , पत्रकार शंकर पानसांडे आदी मान्यवरांच्या उपस्थीतीत पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले.
      यावेळी पूणे येथील नाट्यलेखक भिमराव चव्हाण व किरण जाधव यांनी ५१ वे निष्पाप हे नाटक सादर केले तर मान्यवरांचे स्वागत बालकलाकार यांनी ढोल वाजवून करण्यात आले