डॉ.जयदीप झरेकर आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित

डॉ.जयदीप झरेकर आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानि


-पुणे व रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावर मोफत वैद्यकीय सेवा देणारे डॉ.जयदीप प्रभाकर झरेकर (सचिव, विश्वासोना प्रतिष्ठान)  यांना सांगोला जि.सोलापूर येथील   'तुफान क्रांती समूहातर्फे 'आदर्श समाजसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ओबीसी फौंडेशच्या संस्थापिका स्वातीताई मोराळे, तुफान क्रांतीचे संपादक मिर्झा गालिब मुजावर,पत्रकार राहुल खरात,प्रवीण महाजन ,पिंकी परदेशी,अश्विनी वाळके यांच्यासह राज्यभरातील पत्रकार उपस्थित होते.
      मूळ झरे ता.करमाळा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असलेले डॉ.जयदीप झरेकर हे कोथरूड येथील लक्ष्मीनगर वसाहत भागात वैद्यकीय सेवा देतात.सुटीच्या दिवशी मिळेल त्या वेळात मावळ,आंबेगाव,मुळशी,सातारा,श्रीवर्धन, पेन, रायगड भागातील आदिवासी दुर्गम भागात मोफत वैद्यकीय सेवा देतात तसेच वारी मध्ये आरोग्य शिबिर घेतात.तसेच आय.टी कंपन्यांचे जुने कॉम्पुटर गोळा करून,रिपेअर करून सोलापूर जिल्ह्यातील गरीब गरजू शाळांना मोफत देतात व शाळांमध्ये संगणक कक्ष स्थापन करतात.तसेच शाळामंध्ये वाचनालयदेखील स्थापन करतात.श्री.झरेकर यांनी पाच वर्षात दोनशेपेक्षा अधिक वैद्यकीय शिबिराद्वारा पाच  हजारपेक्षा अधिक रुग्णांवर मोफत उपचार केले असून ग्रामीण भागातील तब्बल 50 शाळांमध्ये संगणक वितरित केले आहेत.तब्बल दहा हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्याना संगणक साक्षर केले आहे.विविध पुरस्कारानी सन्मानित असलेल्या डॉ.झरेकर यांना आदर्श समाजसेवा सन्मान मिळाल्यामुळे  विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.