डाॅ. महेंद्र वाघमारे यांची शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड...

डाॅ. महेंद्र वाघमारे यांची शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड...जिल्हा प्रतिनिधी:-राहुल खरात
कोल्हापूरः डाॅ. महेंद्र बसाप्पा वाघमारे यांची शिवाजी विद्यापीठ वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी निवड झाली असून सदर निवडीचे पत्र कुलसचिव डाॅ. विलास नांदवडेकर यांनी त्यांना दिले आहे.
       डाॅ. वाघमारे यांचे प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा, उमराणी; माध्यमिक शिक्षण के.एम. हायस्कूल, जत तर उच्च माध्यमिक शिक्षण राजे रामराव महाविद्यालय, जत येथे झाले. घरचे अठराविश्व दारिद्र्य दूर करण्यासाठी उच्चशिक्षणाशिवाय पर्याय नाही हे ओळखून गाव सोडले व बी.एस्सी.-बाॅटनी पदवी चे शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय, सांगली येथे घेतले. नंतर कोल्हापूर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहात राहून  एम.एस्सी.-बाॅटनी पदव्युतर शिक्षण शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वनस्पतीशास्त्र विभागातून व नंतर वसंतराव नाईक काॅलेजमधून बी.एड. केले.  लगेच नेट सुध्दा उत्तीर्ण झाले. 
     सद्या डाॅ. वाघमारे हे दि न्यू काॅलेज, कोल्हापूर येथे वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान डाॅ. एस.एस. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी. प्राप्त केली. ते 22 वर्षे झाली अध्यापन व संशोधन कार्यात मग्न आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २ विद्यार्थी पीएच.डी. झाले असून ३ विद्यार्थ्यांना सद्या मार्गदर्शन करत आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत त्यांचे ५२ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. ८० पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील चर्चासत्रे, परिषदा यांमध्ये सहभागी होऊन ५० शोधनिबंध त्यांनी सादर केले आहेत. त्यांनी बॅंकांक तसेच थायलंड येथील संशोधन परिषदेत सहभाग घेऊन गुलाब व टोमॅटो वनस्पतीवरील रोग व त्यांचे निर्मूलन यावर संशोधन पेपर सादर केला होता. 
    डाॅ. वाघमारे सद्या शिवाजी विद्यापीठातीच्या वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी; प्लांट प्रोटेक्शन परीक्षा मंडळ सदस्यपदी; नवीन बीएस्सी सीबीसीएस अभ्यासक्रम मंडळ चेअरमनपदी; सीकेटी महाविद्यालय, मुंबई व विवेकानंद अभिमत महाविद्यालय, कोल्हापूर अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी कार्यरत आहेत. 
    डाॅ. वाघमारे हे दि न्यू काॅलेज, कोल्हापूर च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रकल्प अधिकारी, निसर्ग मंडळ अध्यक्ष, पर्यावरणशास्त्र समन्वयक म्हणून काम पाहतात. नुकताच त्यांना शिवाजी विद्यापीठाने उत्कृष्ठ कार्यक्रम अधिकारी कोल्हापूर जिल्हास्तरीय पुरस्कार दिला आहे. 
    ते गेली १५ वर्षे कवकशास्त्र, वनस्पती व संरक्षणशास्त्र संशोधन कार्यात मग्न असून एक यूजीसीचा संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे.
   डाॅ. वाघमारे हे शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी व शिक्षक यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सतत झटत असल्याने ते विद्यार्थी व शिक्षकप्रिय प्राध्यापक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या कार्याची पोहोचपावती म्हणून शिवाजी विद्यापीठाने त्यांची वनस्पतीशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी पदी निवड केली आहे.  यासाठी त्यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगूरू डाॅ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डाॅ. विलास नांदवडेकर, डी. वाय. पाटील  अभिमत विद्यापीठाचे कुलपती डाॅ. संजय पाटील, प्राचार्य डाॅ. क्रांतीकुमार पाटील, व्यवस्थापन परिषद सदस्य डाॅ. संजय जाधव,  डाॅ. डी.आर. मोरे, डाॅ. पी. एस. पाटील, विभागप्रमुख डाॅ. श्रीमती व्ही. एस. राठोड, डाॅ. डी. के. गायकवाड, प्रा. डाॅ. एस.एस. कांबळे, प्राचार्य डाॅ. व्ही. एम. पाटील, माजी प्राचार्य डाॅ. सी.आर. गोडसे, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, कोल्हापूर चे अध्यक्ष, संचालक मंडळ, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. डाॅ. वाघमारे यांचे निवडीबद्दल शैक्षणिक व सामाजिक स्तरातून अभिनंदन केले जात आहे.