आपत्ती व्यवस्थापन ग्रामस्तरीय समिती स्थापन व ग्रामपंचायत आटपाडी येथे सभा संपन्न
आटपाडी ; प्रतिनिधी / कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता जिल्हाधिकारी सांगली तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सांगली तसेच तहसीलदार तथा अध्यक्ष तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आटपाडी यांचे आदेशानुसार आटपाडी येथे आपत्ती व्यवस्थापन ग्रामस्तरीय समिती सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली. सदर सभेस सचिव आटपाडी चे तलाठी श्री सुधाकर केंगार ग्रामसेवक श्री दत्तात्रय गोसावी डॉक्टर उमाकांत देशमुख, एडवोकेट धनंजय पाटील, उपसरपंच डॉक्टर अंकुश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, विजय पाटील, चंद्रकांत हाके, रावसाहेब सागर, राजेंद्र बालटे, सर्जेराव राक्षे, मधुकर माळी, शिवाजी मेटकरी, वामन माळी, आनंदा ऐवळे, उमाकांत देशमुख, आरोग्य सेवक सुनील केदार, गणेश राक्षे, गटप्रवर्तक मंजुश्री पाटील, यलमर मॅडम, रेशनिंग दुकानदार श्री राजेंद्र जाधव, मुरार गुळभिले, वामन देशमुख, राहुल घोंगडे, अमोल राजमाने, प्रसाद पोतदार उपस्थित होते. सदरची सभा कोरूना विषाणूंच्या अनुषंगाने ठराविक अंतर एकमेकांमध्ये ठेवून शासकीय नियमानुसार पूर्ण करण्यात आली
यावेळी प्रशासनाने दिलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करणे त्यानुसार दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे, प्रशासनाकडून प्राप्त होणारे प्रतिबंधात्मक आदेश याची माहिती गावांमध्ये देणे, अनावश्यक होणारी वाहतूक कोंडी बंद करणे, नागरिकांना घराबाहेर पडू न देणे, स्वच्छता ठेवणे, ताप थंडी सर्दी पडसे खोकला घसा दुखत असेल तर आशा आजाराबद्दल तात्काळ डॉक्टरांना भेटणे तसेच गावामध्ये 15 फेब्रुवारी 2020 नंतर परदेश किंवा अन्य बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ तहसील कार्यालयास कळवणे याबाबत सभेमध्ये चर्चा झाली.
यावेळी अध्यक्ष ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती तथा सरपंच आटपाडी सौ वृषाली धनंजय पाटील यांनी स्वागत केले व सचिव ग्रामस्तरीय आपत्ती व्यवस्थापन समिती तथा तलाठी आटपाडी श्री सुधाकर केंगार यांनी आभार मानले.