सौ.वनिता नलवडे आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित. 

 


 



लुनेश विरकर-म्हसवड



महाराणी देवी अहिल्याबाई होळकर शिक्षण संस्था सांगली चे श्री जानुबाई विद्यालय विरळी या विद्यालयाच्या सहशिक्षिका सौ.नलवडे व्ही. यू.मॅडम यांना नुकतेच आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.



       त्यांनी  विविध स्पर्धा परीक्षांमध्ये  एन .टी .एस .,एम .टी .एस . ,एन .एम. एम .एस .अशा परीक्षेमध्ये अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनवण्यामध्ये मोलाचे मार्गदर्शन केले आहे.  तसेच इयत्ता दहावी भूमिती विषयाचा सतत शंभर टक्के निकाल लावून संस्थेमध्ये सरासरी गुणवत्तेत प्रथम क्रमांक पटकाविले आहेत.  या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन, महिला दिनाचे औचित्य साधून सातारा माध्यमिक शिक्षक संघ व सातारा जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या तर्फे  जिल्हास्तरीय आदर्श महिला शिक्षक पुरस्कार देऊन सौ. नलवडे मॅडम  गौरवण्यात आले.       
         पुरस्कार मिळाल्याबद्ल नलवडे मॅडम यांचे  संस्थेचे माननीय चेअरमन आर .एस .चोपडे सर व व्हाईस चेअरमन श्रीमती शेंडगे एल.टी. मॅडम., सचिव एस . ए. पाटील सर ,संस्थेचे सर्व पदाधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक माने के .के.सर, व सर्व स्टाफ, माण तालुका टी.डी.एफ. संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ नलवडे सर,  ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.





  • फोटो:


    सातारा: मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षिका पुरस्कार स्विकारताना सौ.व्ही.यू.नलवडे मॅडम 




    " अहिल्या शिक्षण संस्थेचा ही सन्मान "


 अहिल्या शिक्षण संस्थेला सुध्दा सदर कार्यक्रमात  'आदर्श शिक्षण संस्था ' हा पुरस्कार देण्यात आला.  संस्थेचे संचालक एस.एन.विरकर यांनी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला.