पुणे ; कोरोनामुळे संपूर्ण जगाचे जनजीवन विस्कळित झाले आहे. याला ऊसतोड मजूर ही अपवाद नाही. आज हजारो ऊसतोड मजूर साखर कारखान्यावर अडकून पडला आहे. ! अनेकांच्या संपर्कात मी सतत आहे. संत तुकाराम साखर कारखान्यावर मजुरांना मारहाण झाली होती तेंव्हा त्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता तेंव्हा लगेच हिंजवडी पोलीस स्टेशन शी संपर्क साधून सांगितले आहे. हे मजूर चिंतातूर आहेत परंतु त्यांना लवकर घरपोच करण्यासाठी प्रयत्न करू. ! असे स्वाती ताई नी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले आहे !
मा. आ. नरेंद्र दराडे यांच्याशी चर्चा करून मुख्यमंत्री व मा. आदित्य ठाकरे यांच्या सोबत चर्चा करायला सांगितले. आहे ! मुख्यमंत्री साहेबांनी सकारात्मका दाखवली आहे. आहे त्या ठिकाणी सध्या सुरक्षित रहा लवकरच त्यांना घरी पाठवण्याची सोय करू असे मुखयमंत्र्यांनी आश्वासन दिले आहे !. इतर राज्यात ही अनेक ऊसतोड मजूर अडकले आहेत त्यांना घरी पोहच करण्याची जबाबदारी घेतली आहे.!
परंतु या मजुरांना खरी काळजी आहे त्यांच्या गावी असलेल्या मुलांची. अनेक मजुरांची मुले शिक्षणासाठी गावी आहेत. आणि प्रत्येक गावात पुणे मुंबई वरून गावी आलेल्यांची संख्या वाढली आहे यांच्या संपर्कात ही मुले येत आहेत याची. याबाबत त्यांना समजाऊन सांगितले आहे. त्यांना मास्क नाहीत भाज्या उपलब्ध होत नाहीत त्यासाठी भाज्या उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. अनेकांना मास्क उपलब्ध झालेले नाही, त्यांना मास्क मिळवून देण्याचे काम सुरू आहे. परंतु मी संपूर्ण ऊसतोड मजुरांना लवकरच घरी पोहचवण्यसाठी प्रयत्न करत आहे. सर्वांना आव्हान करते आपण सध्या आहे तिथे स्वतःची काळजी घ्या. तुम्हाला घरी पोहचवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे
ऊसतोड मजूर चिंतातूर परंतु लवकरच तुम्हाला घरपोच करू" : स्वातीताई मोराळे.