पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन


 


पुणे :
ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचं नुकतच पुण्यामध्ये दुःखद निधन झालं मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते विविध नामांकित वर्तमानपत्रांमध्ये त्यांनी गेली चाळीस वर्ष संपादक पदावर काम केलेला आहे .
दैनिक लोकमत दैनिक सकाळ या वृत्तपत्र मध्ये ते मुख्य संपादक या पदावर याबाबत त्यांनी काम केलेले  होते .


अनेक वर्षे राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी काम केलं. टीव्ही चॅनल वर तज्ञ म्हणून ते सतत लोकांना मार्गदर्शन करीत.


 पुणे येथील खाजगी रुग्णालयात आज सोमवारी त्यांचं दुःखद निधन झाले. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मनमिळावू स्वभावामुळे ते सर्वांमध्ये लोकप्रिय होते.


मुळचे बार्शी ता. सोलापूर येथील ते रहिवासी होते. त्यांच्या पाठीमागे पत्नी व एक कन्या असा परिवार आहे.