मुंबई.
सलाम बॉम्बे फाउंडेशन ही संस्था मागील १८ वर्षापासून तंबाखू नियंत्रण तसेच जीवनकौशल्य विकास या विषयावर महानगरपालिका आणि अनुदानित शाळांमध्ये विवीध कार्यक्रमांचे आयोजन करते. कला, क्रीडा, मिडीया तसेच व्यावसायीक प्रशिक्षण या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना प्रशिक्षण दिले जाते. कला अकादमीद्वारे विद्यार्थ्यांना नाटक, वेस्टन डान्स, कथ्थक, संगीत, क्रिएटीव्ह अशा अकादमीद्वारे प्रशिक्षण मिळते, ज्यामध्ये विद्यार्थी शाळेत राहुन आपल्या कलागुणांच्या जोरावर आपले भविष्य घडवू शकतात.
गेल्या १२ वर्षामधील देण्यात येणार्या कला प्रशिक्षणाच्या अनुभवावरून कला प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे ही बाब लक्षात घेता सलाम बॉम्बे फाउंडेशन व तमाशा थिएटर यांच्या संयुक्त विद्यमाने कलाप्रशिक्षणातून विद्यार्थांचा सर्वांगीण विकास या परिसंवादाचे आयोजन दिनांक १३ मार्च २०२० रोजी सकाळी १०:३० ते दुपारी २ वाजेपर्यंत रविंद्र नाट्यमंदिर येथे केले आहे. या परिसंवादात सुनिल शानबाग ( दिग्दर्शक तमाशा थिएटर), कांचन सोनटक्के ( बाल नाट्य तज्ञ), मुश्ताक शेख ( शिक्षण अधिकारी) राजश्री शिर्के ( नृत्य दिग्दर्शीका), तिमीरा गुप्ता (अक्षरा स्कूल), चिन्मय केळकर (गोष्टरंग) असे मान्यवर सहभागी होणार असून शालेय शिक्षणासोबत कला प्रशिक्षणाचे महत्त्व , कलाप्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा जीवनकौशल्य विकास, सध्यस्थिती आणि भविष्यातील संधी या विषयावर संवाद साधतील. परिसंवादाबरोबरच कला अकादमीतील निवडक विद्यार्थी आपल्या कलाकृतींचे सादरीकरण करतील. सदर कार्यक्रमातून कलाक्षेत्रात काम करणारे विद्यार्थी , प्रशिक्षक आणि कलासंस्था यांना निश्चितच प्रेरणा मिळेल.
अमृता शिंदे