जावली तालुका भाजपा कार्यकारणी जाही
जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
मेढा(प्रतिनिधि):-भारतीय जनता पार्टिच्या माध्यमातून जावली तालुक्याची नवीन कार्यकारिणी निश्चित चांगल्या प्रकारचे काम करेल व येणाऱ्या काळात पक्षाची धेय्य धोरण सर्व सामान्य जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाईल व जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही सर्वच जण प्रयत्नशील राहु असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी केले
जावली तालुक्याच्या नवीन कार्यकारिणी चा नियुक्ती पत्र प्रदान कार्यक्रम कुडाळ येथील अक्षता मंगल कार्यालयात भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष श्री विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षेतखाली व सातारा जावली विधानसभेचे आमदार श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला,यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांना पद नियुक्ती पत्र देऊन गौरवण्यात आले.याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस महेंद्रकुमार डुबल, विठ्ठल शेठ बलशेठवार , सातारा शहर अध्यक्ष श्री विकास गोसवी, नगरसेवक विकास देशपांडे , जेष्ठ नागरीक बंडूशेठ ओंबळे,विठ्ठल देशपांडे,तालुकाध्यक्ष श्रीहरी गोळे,महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा गीताताई लोखंडे व तालुक्यातील बहुसंख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थितीत होते.
भाजपा जिल्हाध्यक्ष श्री विक्रम पावसकर यांनी नवनियुक्त पदाधिकारी यांना पदनियुक्तीपत्र देऊन आगामी काळात सर्वांनी पक्ष संघटना वाढवून सर्वसामान्य लोकांच्या तळागाळातील अडी अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याचे काम करावे असे आवाहन केले. तसेच नवीन पदाधिकारी यांनी पक्षसंघटना शिस्तबद्ध पणे काम करून आगामी नगरपंचायत , जिल्हापरिषद , पंचायत समीती निवडणूकीत जावलीत कमळ फुलेल अशी आशा व्यक्त केली.
यावेळी भाजपा जावली तालुका उपाध्यक्ष पदी भानुदास ओंबळे , गणेश पवार, किरण भिलारे यांची तर सरचिटणीस पदी गणपत पार्टे, सचिव पदी प्रदीप बेलोशे, बजरंग चौधरी, महिला उपाध्यक्ष पदी श्रीमती सोनिया धनावडे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महिला मोर्चा च्या तालुकाध्यक्ष पदी सौ वैशालीताई सावंत , किसान मोर्चा अध्यक्ष पदी श्री रमेश तरडे उपाध्यक्षपदी संजय बिरामणे, तर ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्री प्रकाश सुतार, उपाध्यक्ष शरद दुधाणे, युवा मोर्चा अध्यक्ष पदी सागर देशमुख , उपाध्यक्ष मेघराज देशमुख , ज्ञानेश्वर आखाडे , युवती मोर्चा अध्यक्ष पदी कु. मोनिका परामणे, वहातूक आघाडीच्या तालुका संयोजक पदी अरूण गुजर, उद्योग आघाडीच्या अध्यक्ष दीपकशेठ गावडे, अनु.जाती आघाडी राजाराम भिसे, दिव्यांग आघाडी अध्यक्षपदी संजय दळवी. रंगकामगार आघाडी अध्यक्ष पदी अनिल बेलोशे, उपाध्यक्ष पदी नितेश पवार यांच्या सह इतर पदाधिका-यांच्या नियुक्ती करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीहरी गोळे यांनी केले तर विकास देशपांडे यांनी आभार मानले.