कोरोना ची काळजी घेण्यासाठी पुकारलेल्या म्हसवड बाजारपेठ बंद ला १००℅प्रतिसाद

कोरोना ची काळजी घेण्यासाठी पुकारलेल्या म्हसवड बाजारपेठ बंद ला १००℅प्रतिसाद 


म्हसवड :प्रतिनिधी -
म्हसवड येथील व्यापारी संघटनेने पुकारलेल्या मसवड बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे म्हसवड परिसरातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने आज दिनांक 21 रोजी शहरातील सर्व दुकाने बंद ठेवून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केला .
 म्हसवड येथील व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हसवड पोलीस स्टेशन व नगरपालिका यांची संयुक्त बैठक घेऊन काल 20 रोजी याबाबत निर्णय घेतलेला होता. या निर्णयाला म्हसवड शहरातील नागरिकांनी स्वतःहून शंभर टक्के प्रतिसाद दिला आणि शहरातील किराणा व अत्यावश्यक सेवा यांची दुकाने वगळता सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य केले मसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी शहरातील नागरिकांना याबाबत काळजी घेण्याची आवाहन केलेले आहे या आवाहनास शहरातील नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे कळविले आहे शहरातील मुख्य बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद होती मसवड येथील सिद्धनाथ मंदिर व श्री विरभद्र मंदिर ही मंदिरे यापूर्वीच बंद ठेवण्यात आलेली आहेत पुजारी व्यतिरिक्त या मंदिरात कोणासही प्रवेश दिला जात नाही उद्या दिनांक बावीस रोजी च्या जनता कशी या साठी लोकांनी सहकार्य करावे व सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत बाहेर पडू नये घरात बसून राहावे असे आवाहन नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर यांनी केले आहे.एऔ