करोना ला  घाबरून न जाता, नागरिकांनी काळजी घ्यावी : मुख्याधिकारी म्हसवड.

करोना ला  घाबरून न जाता, नागरिकांनी काळजी घ्यावी : मुख्याधिकारी म्हसवड


म्हसवड. ् प्रतिनिधी -
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू जिल्हाधिकाऱ्यांनी केले आदेश जारी केला आहे. कोरोना बाबत जागृती करण्यासाठी म्हसवड नगरपालिकेतील सभगृहात  नुकतीच ग्रामस्थ, नगरसेवक, व वैद्यकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, नगरसेवक गणेश रसाळ, नगरसेवक कारंडे, नगरसेवक अकिल काझी, नगरसेवक विकास गोंजारी याच बरोबर म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी चेतना केरुरे या  उपस्थित होत्या.
 म्हसवड नगरपालिका हद्दीतील डॉक्टर्स शिक्षक प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी या वेळेला उपस्थित होते.


यावेळी मुख्याधिकारी या म्हणाल्या, म्हसवड परिसरामध्ये असलेल्या  लोकांनी कोरना मुळे घाबरून जाण्याची काही गरज नाही प्रत्येकाने काळजी मात्र घ्यावी.
 स्वच्छता राखणे व वैयक्तिक स्वच्छता याची काळजी घ्यावी मुंबई आणि पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे एखाद्या रुग्णास याबाबत माहिती मिळाली तर त्यांनी त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात कळवावी .
प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये याबाबत तातडीने उपचार करण्यासाठी साधा वैद्यकीय अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत तसेच नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रत्येक भागात व वॉर्डांमध्ये तपासणी टीम तयार करण्यात आलेली आहे त्यांच्यामार्फत शहरातील लोकांचे आरोग्याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे परिसरातील लोकांनी गर्दी करू नये लग्नकार्य व इतर धार्मिक उत्सव करताना जास्त गर्दी करू नये असे आवाहन म्हसवड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी केले.
 या वेळी भगतसिंग वीरकर म्हणाले, शहर परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आलेली आहे.
त्यानुसार शहरातील शौचालय व स्वच्छता गृह अधिक स्वच्छ करण्यात येणार आहेत.
यावेळी अस्थिरोगतज्ञ  डॉक्टर बाबासाहेब दोलताडे,डॉक्टर सूर्यकांत फुटाणे, डॉक्टर डी.पी खाडे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
 यावेळी  शहरातील प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक गणेश रसाळ यांनी केले.
आठवडा बाजार बंद करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही.मात्र याबाबत जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानुसार निर्णय घेण्यात येणार आहे म्हसवड परिसरामध्ये लोकांनी अफवा पसरवू नयेत व अफवा पसरवणारे मेसेजेस मोबाईल वरून व व्हाट्सअप वरून पाठवू नयेत याबाबत चुकीचे मेसेज पाठवल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे मत म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे यांनी व्यक्त केले.
 यावेळी म्हसवड परिसरातील लोकांनी स्वतः काळजी घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संशयित रुग्णांची माहिती द्यावी व तातडीने उपचार घ्यावेत असे आवाहन म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.