उद्योजक राजेंद्र धनावड़े यांच्या कडून समाजोपयोगी कार्य



मेढा(प्रतिनिधी):-केळघर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भौतिक सुविधा परिपूर्ण होण्यासाठी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धनावडे यांनी वेळोवेळी मदत केली आहेच, आताच्या कोरोनाच्या संकटाला तोंड देण्यासाठी राजेंद्र धनावडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एन-95 मास्क व सॅनिटायझर देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यांची समाजाप्रती असलेली तळमळ प्रशंसनीय असल्याचे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना कवारे यांनी केले. 
          प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना उद्योजक राजेंद्र धनावडे यांच्या कडून मास्क व सॅनिटायझर देण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सरपंच रवींद्र सल्लक,उद्योजक सचिनशेठ पार्टे, दीपक मोरे,जगन्नाथ पार्टे,राज पार्टे, अक्षय चिकणे, नवनाथ बेलोशे आदींची उपस्थिती होती.
केळघर परिसरातील गावांमध्येही धनावडे यांच्या वतीने २०० गरीब व निराधार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तसेच पोलीस आशा,अंगणवाडी सेविका यांनाही मास्क व सॅनिटायझर चे वाटप धनावडे यांच्या वतीने करण्यात आले. राजेंद्र धनावडे यांनी दाखवलेल्या या दातृत्वाबद्द्ल त्यांचे सर्वच स्तरा तुन कौतुक करण्यात येत आहे.