लोणंद येथे 10 रोजी रक्तदान शिबिर संपन्न


 लोणंद - (दिलीप वाघमारे याजकडून)


 सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते अँडव्होकेट बाळासाहेब बागवान उपाध्यक्ष सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस कमिटी यांच्या आवाहनानुसार लोणंद शहरांमध्ये सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी व श्री गणेश मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती मंदिरामध्ये रक्तदान शिबीर संपन्न झाले.


  कोरोणा विषाणूच्या विरोधातील युद्धामुळे अखिल भारतीय पातळीवर रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ शकतो व गरजूं रुग्णांना रक्ताची चणचण भासू लागेल,
या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबिर घेण्यात आले. 
या रक्तदान शिबिर मध्ये  महिलांनी सहभाग नोंदवला.


 रक्तदान शिबिर संपन्न करण्यासाठी श्री तारीख भाई बागवान राजू  डोईफोडे नगरसेवक सौ स्वाती भंडलकर नगरसेविका श्रीमती शैलजा खरात नगरसेविका मस्को आण्णा शेळके पाटील प्राध्यापक रघुनाथ शेळके पाटील श्री गणेश शेळके पाटील अरुण भंडारी गणेश डोईफोडे आधी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.