जावलीत किराणा दुकानदाराना दर पत्रक लावण्याच्या सूचना
तहसीलदार शरद पाटिल यांची सरप्राइज व्हिझिट
मेढा(प्रतिनिधी):-सातारा जिल्ह्यासह जावली तालुक्यात जमावबंदी व संचार बंदी आदेशाची अंमलबजावणी जोरात चालू असताना अत्यावश्यक सेवा देणाऱ्यां मधील घटक जादा दराने किराणा माल, भाजीपाला यांची विक्री करीत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने जावली तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी सायगाव-आनेवाडी, बामणोली भागात किराणा दुकानात अचानक भेटी दिल्याने दुकान दारांची चांगलीच धावपळ झाली,
तालुक्यातील ग्रामीण भागात मुंबई पुणे सह राज्यातील अनेक ठिकाणा हुन चाकर मानी परतली असून त्यामुळे खाणाऱ्यांची तोंड वाढल्याने अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या किराणा दुकानात गर्दी वाढू लागली प्रशासनाने जमावबंदी चे आदेश देवून ही खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे त्यातून तालुक्यातील काही दुकानात जादा दाराने मालाची विक्री होत असल्याची तक्रार तहसीलदार यांच्या पर्यंत गेल्याने जावली चे तहसीलदार शरद पाटिल यांनी तालुक्यातील सायगाव आनेवाडी सह अन्य भागात सरप्राइज़ भेट दिली त्यावेळी त्यांनी संबधित किराणा दुकानदाराना जादा दराने विक्री न करता सर्वसामान्य जनतेकडून वाजवी कीमती पेक्षा पैसे न घेता मालाची विक्री न करण्याच्या सूचना दिल्या सोबतच अत्यवश्यक सेवे मधील दुकाने देखील बंद करु नयेत तसे आढळून आल्यास त्यांच्या वर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगितले
यावेळी मंडल अधिकारी व तलाठी याना सूचना करीत भागातील सर्व छोट्या मोठ्या किराणा दुकान दारानी दुकानाच्या बाहेर दर पत्रक लावण्यास सांगितले व महसूल कर्मचारी यांनी सायगाव-आनेवाडी भागातील दुकानातील दर पत्रकाची माहिती तहसील कार्यालयात द्यावेत जेणें करुण मालाची साठे बाजी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करता येईल तसेच होलसेल व रिटेल दरा मधील माहिती मिळाल्यास सातारा सह बाहेरच्या ठिकाणा हुन माल देणारे मोठे व्यापारी यांना आवश्यक तेवढा माल देण्याच्या व जादा दर न लावण्याच्या सूचना करणार असल्याचे तहसीलदार शरद पाटिल यांनी सांगितले
तहसीलदार यांनी स्वतः हातात घेतला दंडुका
आनेवाडी गावात प्रवेश करताच मुख्य चौकात तरुण युवकांचा घोळका दिसताच तहसीलदार शरद पाटिल यांनी गाड़ी तुन उतरून युवकाना चोप दिला अचानक सुरु झालेल्या कारवाईने युवकांची पळापळ सुरु झाली,तहसीलदार यांनी हातात घेतलेल्या दंडुकाची चर्चा दिवसभर गावात होत होती
पोलिस पाटलानी स्वतः हातात काठी घेवून युवकाना व विनाकारण फिरणाऱ्या वर कारवाई करावी, तसेच मंडल अधिकारी, तलाठी यांनी आपल्या विभागात आपत्ति व्यस्थापन कायदयाची कड़क अंमलबजावणी करण्यास तहसीलदार यांनी सांगितले