लोणंद महिला सफाई कामगाराचे आरोग्य धोक्यात.

लोणंद सफाई कामगारांना मास्क व ग्लोज नसल्याने नाराजी ,
सफाई कामगाराचे आरोग्य धोक्यात.


 लोणंद: दि.१ (दिलीप वाघमारे याच्याकडून) 
 सातारा जिल्हाधिकारी यांनी संचारबंदी 144 कलम लागू केले आहे.
 तसेच लोणंद नगरपंचायत कार्यालय १ एप्रिल ते ५ एप्रिल पर्यंत बंद पाळण्यात येणार आहे.
सगळे बंद असले तरीसुद्धा नगरपंचायतीच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना  मास्क व ग्लोज शिवाय काम करावे लागते आहे.  यामुळे सफाई कामगाराचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
काम करणाऱ्या ची काळजी नगरसेवक व नगराध्यक्ष  घेताना दिसत नाहीत. 
असे चित्र लोणंद शहरात दिसत आहे.
या कर्मचाऱ्यांना उन्हात व मास्क न लावता, व सुरक्षित पोशाख नसतांनाही काम करावे लागते आहे.
या कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा गोळा करण्यासाठी खुप त्रास होत आहे.
ग्रामस्थांना रोगराई होऊ नये यासाठी हे कर्मचारी काम करत आहेत पण याची कल्पना नागरिकांना नाही. तसेच नगरपालिका प्रशासन हि याबाबत काळजी घेताना दिसत नाही.


सर्व ऋतूमध्ये कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी  महिनाभर पगाराची वाट पहात जीवन जगणाऱ्या या  महिला कामगारांना रोगराई होऊ नये यासाठी नगरपंचायतीने काळजी घेणे काळाची गरज आहे असे मत सामाजिक कार्यकर्ता श्रीमती सीताबाई भोसले यांनी केले आहे