लोणंद :
कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा आजार आटोक्यात आणण्यासाठी लाॅकडाऊन परिस्थिती असताना शहरातील निराधार वयोवृद्धांना लाॅकडाऊन मधील गैरसोय होऊ नये म्हणून मदतीचा हात देत आज सलग सातव्या दिवशी साथ प्रतिष्ठानचे वतीने लोणंद शहरातील निराधार वयोवृद्धांना किमान ०७ दिवस पुरेल एवढे जिवनावश्यक किराणा मालाचे साहित्यांचे वाटप करण्यात आले.
तसेच शहरातील विविध भागांतील गरीब गरजू कुटुंबांना व परप्रांतीयांना तांदूळ व डाळ पॅकेटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, साथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष कय्युम मुल्ला,मंगेश माने, दिपक बाटे, दिपक जाधव, अजित घोलप, स्वप्नील बुरुंगले पाटील, गौरव फाळके, प्रतिक टेलर आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.