म्हसवड : प्रतिनीधी
वरकुटे-मलवडी ता माण येथिल तीन किराणा दुकानदारांवर कोरोना विषाणुच्या साथीच्या रोगाचा गैरफायदा घेऊन जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करत असताना आढळुन आल्याची तक्रार माण तालुका पुरवठा निरीक्षक राहुल जाधव यांनी म्हसवड पोलिसांत दाखल केली असुन संंबधित दुकानदारांकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर केंद्र सरकार कडुन घोषित करण्यात आलेल्या 21 दिवसाच्या लाँकडाऊन च्या काळात जिवनावश्यक म्हणुन आत्यावश्य सेवा म्हणुन वगळण्यात आलेल्या सेवांमधिल वरकुटे-मलवडी ता माण येथिल तीन किराणा दुकानदारांवर कोरोना विषाणुच्या साथीच्या रोगाचा गैरफायदा घेऊन जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार करत असताना आढळुन आल्याची तक्रार माण तालुका पुरवठा निरीक्षक राहुल जाधव यांनी म्हसवड पोलिसांत दाखल केली असुन संंबधित दुकानदारांकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत म्हसवड पोलिसांतुन मिळालेली माहीती अशी, कि 3 एप्रिल रोजी माणच्या तहसिलदार सौ बाई माने याना फोन वरून वरकुटे-मलवडी या गावात आत्यावश्यक जिवनापयोगी वस्तुची शासनाने निर्धारीत केलेल्या किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री करत असल्याची तक्रार आली होती.
मा तहसिलदार यांनी वरकुटे मलवडीचे गावकामगार तलाटी गणेश म्हेत्रे,क्लार्क ए के पवार, व मंडल अधिकारी सुधिर दळवी, यांना डमी ग्राहक म्हणुन तपासणी करण्यास सांगितल्यानुसार वरील टिम ने वरकुटे-मलवडी येथिल श्रध्दा किराणा स्टोअर्स चे मालक यांच्या विरोधात तक्रार दिली.
हरभरा डाळ ची शासकिय विक्री किंमत 60 रू किलो असताना 65 रू किलो दराने, साखर 35 रू किलो असताना 39 रू किलो ने तर शेंगदाणे 100 रू किलो असताना 128 रू किलो येवढ्या चढ्या भावाने विक्री करत असताना आढळून आले.
तर याच गावातील माणतीर्थ किराणा स्टोअर्स चे मालक हे साखर 35 रू किलो असताना 40 रू किलो ने तर शेंगदाणे 100 रू किलो असताना 130 रू किलो येवढ्या चढ्या भावाने विक्री करत असताना मिळुन आले.
तर स्वामी समर्थ किराणा स्टोअर्सचे मालक हे हरभरा डाळ 60 रू किलो असताना 65 रू किलो ने व मुगडाळ 105 रू किलो असताना 120 रू किलो ने येवढ्या चढ्या दराने विक्री करत असताना मिळुन आल्याने त्यांच्या विरोधात भा द वि स 188 , 186 जिवनावश्यक वस्तुचा कायदा 1955 चे कलम 3व7 जिवनावश्यक वस्तुचा काळाबाजार प्रतिबंंधक आणि सुरळीत पुरवठा अधिनियम 1980 चे कलम 7 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.