पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीने केले पाचशे पी. पी. इ .चे वाटप !


   पंढरपूर  ; प्रतिनिधी /
    पंढरपूर विठ्ठल मंदिर समितीकडून समितीचे सदस्य श्री संभाजीराजे शिंदे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर यांना 500 पीपीइ.चे वाटप करण्यात आले. यावेळी पंढरपूर तालुक्यातील आठही पी एच सी चे अधिकारी उपस्थित होते.
      त्याचप्रमाणे ह. भ .प. जळगावकर महाराज व साधनाताई भोसले, शकुंतला गिरी ताई यांच्याकडून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर बोधले यांच्याकडे पाचशे पी.पी.इ.सोपविण्यात आले. यावेळी खर्डी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विलास जाधव उपस्थित होते. तसेच १०८चे डॉक्टर अनिल काळे व पंढरपूर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रा मधील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, उपजिल्हा रुग्णालयांमधील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते....