आटपाडी दि . १४ ( प्रतिनिधी )
माणुसकी , इन्सानियत , दोस्ती , सह्रदयता , प्रेम , दातृत्व या सारख्या अंतरीच्या अनेक शब्दांचा यथार्थ गौरव करणारी कृती राजेवाडीच्या दोन अवलियांनी करून खऱ्या अर्थाने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर साहेबांची जयंती साजरी केली आहे .
झोपडी , पत्रे उडालेल्या , भिंतीस भेगा पडल्याने उघडयावर रहात असलेल्या गरीब, वृध्द , उपेक्षित कुटुंबास मदतीसाठी मित्राने केलेल्या आवाहनास कसलीही शहानिशा , खातरजमा न करता, हजारो तरूण -- ज्येष्टांचे आदर्श राजेवाडीचे श्री. सुभाष सातपूते आणि सेवानिवृत कार्यकारी अभियंता पी .एम . वाघमारे साहेब यांनी २५ हजार रुपयेची रोख रकमेची आणि अन्नाच्या कीटची मदत करून प्रतिकुल परिस्थितीच्या वादळी वावटळीत माणुसकीच्या प्रेमाची ज्योत तेवत ठेवून महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या आजच्या जयंतीदिनी त्यांना कृतीशील आदरांजली वाहीली आहे . त्यांच्या या परमेश्वरी अंशाच्या मानवतावादी सेवेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .
आटपाडी - दिघंची रोडवरील माणगंगा सह . साखर कारखाना पाटी जवळच्या एस .आर . पेट्रोल पंपा जवळ शंकर दत्तात्रय ढोबळे वय ६५ , त्यांच्या पत्नी सौ . कमल शंकर ढोबळे वय ६१ आणि मुलगा संतोष शंकर ठोबळे वय २८ हे तिघे जण आपल्या २ गुंठे जागेतल्या झोपडीत राहतात , वृध्द दांम्पत्य मोलमजुरी करून आपली उपजिविका करतात तर संतोष , मिळेल त्या कामातून घरास मदत करीत असतो . शासकीय योजनेतून मिळालेले घरकुल जवळजवळ पूर्ण होत आले असतानाच १७, १८ मार्च च्या दरम्यान आलेल्या वादळी वारा आणि पावसाने घरावराचे काही पत्रे उडाले , बांधकामाला तडे गेले तर शेजारची झोपडी ही उध्वस्त झाली , मोठे नैसर्गीक संकट कोसळलेल्या संतोषने आटपाडीचे सामाजीक कार्यकर्ते , राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक यांच्याशी संपर्क करून वास्तव निदर्शनास आणले , तहसीलदार , तलाठी यांच्याशी संपर्क करून सादिक खाटीक यांनी या परिवारास शासकीय मदतीसाठी विनवले,
कालच्या वादळी वारा , वीजांचा कडकडाट आणि पावसाच्या वातावरणाने भेदरलेल्या संतोषने पुन्हा सादिक खाटीक यांना विनवले . हरणकाळजी , भावूक असलेल्या सादिक खाटीक यांनी २७ - २८ दिवसानंतर शासनाधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केल्यानंतर , मोठा वादळी पाऊस पडल्यानंतरच अशा आपदग्रस्तांना शासन मदत करू शकते असे शासनाकर्त्याकडून मिळालेल्या उत्तराने निराश झालेल्या सादिक खाटीक यांनी आपल्या राजेवाडीच्या दोन अवलिया मित्रांना या कुटुंबाच्या मदतीसाठी साद घातली आणि क्षणाची उसंत न घेता या दोघांनीही यथायोग्य मदत करण्याची तत्परता दाखविली .
आणि काल रात्री फोनवरून दिलेल्या शब्दास जागत आज संतोष ढोबळे यांच्या झोपडीजवळ जावून अवलिया सुभाष सातपुते आणि अवलिया पी . एम . वाघमारे साहेबांच्या वतीने श्री . सुभाष सातपुते यांनी रोख २५ हजार रुपये आणि दैनंदिन वापरातल्या पदार्थ, वस्तुंचे कीट देवून ढोबळे कुटुंबियास मदत करण्यात आली . योग्य वेळी आणि अत्यंत मोलाच्या झालेल्या मदतीने ढोबळे कुटूंबीय सदगदित झाले .
जिंदाबाद ! जिंदाबाद ! ऐे इन्सानियत जिंदाबाद !
जिंदाबाद ! ऐ मोहब्बत , दोस्ती, जिगर जिंदाबाद !
काहीशा अशाच स्वर - सुरांनी आसमंतात आनंद लहरी सोडल्या .
यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक , पुजारवाडीचे सुदर्शन जावीर , मुस्लीम समाजाचे युवा नेते सलमान शेख , एस प्रोफाइल चे सचिन आटपाडकर इत्यादी उपस्थित होते .