आसपास च्या गावात कड़क लॉकडाउन
मेढा(प्रतिनिधी):-जावळी तालुक्याच्या दक्षिणे कडील ग्रामीण भागात कोरोना ने प्रवेश केला असून तालुक्यातील एका गावांतील एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली असून या गावच्या आसपास हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तसेच या रुग्णाच्या कुटुंबासह त्याच्या संपर्कात आलेल्या गावातील व्यक्तीची आरोग्य विभाग तातडीने तपासणी सुरु केली असून, या कोरोना रुग्णाच्या आणखी किती जण संपर्कात आहेत, याचा शोध सुरु झाला असल्याने लोकांच्यात घबराट निर्माण झाली आहे,
जावली तालुक्यात मधे कोरोना रुग्ण सापडल्याने युद्ध पातळीवर जावली पंचायत समितीमध्ये जिल्हाधिकारी शेखर सिंग, जिल्हा पोलिस प्रमुख तेजस्वीनी सातपुते , तहसिलदार शरद पाटील व तालुका प्रशासन यांची तातडीची बैठक होवून त्यामध्ये उपाययोजना त्वरित करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले
जावली तालुक्यातील एका गावात आलेल्या ५४ वर्षीय टँक्सी चालक हा १३ दिवसांपूर्वी मुंबईहून येथे आला होता.
जावळी तालुक्यात पहिला रुग्ण आढळल्याने,जिल्हाधिकारी शेखर सिंह व तहसीलदार शरद पाटील यांनी तातडीने या गावात जाऊन संपूर्ण गाव लॉकडाऊन केले असून कोणालाही येण्यास जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे,सदरच्या रुग्णास मुंबई वरुन आल्या नंतर सर्दी ताप झाल्याने काही काळ जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपचार झाले असल्याचे स्थानिकानी सांगितले,
हा कोरोनाचा रूग्ण आजारी असताना त्याचे नातेवाईक व गावांतील ही काहीजण त्याला बघायला गेल्याचे ग्रामस्थानी सांगितले.
मुंबई येथून आल्या नंतर या रुग्णाने जवळच्या मेढा बाजार पेठेतही तसेच आसपासच्या परिसरात ही बाजार खरेदी साठी प्रवास केल्याची धक्कादायक माहिती आहे. तसेच मेढा येथील एका खासगी डॉक्टर व किराणामाल दुकानदारांच्या संपर्कात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली असल्याने. त्यांची चौकशी करून दुकानदार आणि डॉक्टर यांनाही प्रशासनातर्फे होम क्वारंटाईनचे आदेश दिले असून,संपर्कात आलेल्यांना सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पुढील तपासणी करीता पाठविले आहे.