लोणंद-
रूई ता . खंडाळा गावचे हदीत निरा उजवा कालवाचे बाजुला सामुदाईक मळा नावचे शिवारात अल्टो मारुती गाडी नंबर एमएच १२ बीपी १४०७ यामधुन विदेशी दारूच्या चोरटी दारु विक्री केल्याप्रकरणी लोणंद पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दारु विकणारा इसम पळुन गेला आहे.
या दारुच्या छाप्यात दारुच्या बाटल्या व अल्टो कार असा एकुण १ लाख६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याबाबत लोणंद पोलिस स्टेशनवरुन मिळालेली माहीती अशी की, बुधवारी रोजी लोणंद पोलीस ठाणे हदीत कोरोना अनुषंगाने लोणंद पोलीस ठाणे संतोष चौधरी यांना शासकिय वाहनाने स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , मौजे रूई ता . खंडाळा गावचे हदीत निरा उजवा कालवाचे बाजुला सामुदाईक मळा नावचे शिवारात अल्टो मारुती गाडी नंबर एमएच १२ बीपी १४०७ यामधुन विदेशी दारूच्या बाटल्याची चोरटी विक्री करीत आहे , अशी बातमी मिळाल्यावर त्यानी त्याच भागात अधिग्रहन वाहनातुन पेट्रोलिंग करणारे बीट अंमलदार पो ना ज्ञानेश्वर मुळीक , सहा फोजदार शौकत शिकीलकर , सहा फौजदार देवेद्र पाडवी , पोकॉ अविनाश शिंदे यांना फोन करुन सदर भागात जावून छापा टाकण्याची माहिती दिल्यावर सदर स्टाफने अधिग्रहन वाहनातुन जावुन रुई गांवचे हदीत सापळा लावुन अल्टो मारुती गाडी नंबर एमएच १२ बीपी १४०७ ही गाडी घेवुन कॅनालचे कडेला उभा राहुन पैसे घेवुन विदेशी दारु देत असताना दिसल्यावर तेथे छापा टाकला.
परंतु सदर इसमास पोलीसाची चाहुल लागल्याने दारु विकणारा व विकत घेणारा इसम त्याठिकाणाहुन शेतातुन पळुन गेले , सदर अल्टोगाडीची झडती घेतली असता त्यामध्ये मागील सीटवर दोन प्लॅस्टीकच्या गोणीमध्ये ऑफीसर चॉईस विदेशी दारुच्या १८० मिलीच्या एकुण १४० बाटल्या व मारुती अल्टो कार असा एकुण मिळुन १लाख ६६ हजार ८०० रुपयांचा माल मिळून आला आहे . सदर छापा यशस्वी करणेकामी सहायक पोलीस निरीक्षक , संतोष चौधरी , देवेंद्र पाडवी , शोकत शिकिलकर , यशवंत महामुलकर , महेश सपकाळ , ज्ञानेश्वर मुळीक , संतोष नाळे फैय्याज शेख , अविनाश शिंदे , चालक विजय शिंदे , यांनी मदत केली आहे .