मुंबई येथील पोलीस हवालदार बापुराव धायगुडे यांचे अल्प आजाराने निधन.



●दिलीप वाघमारे●
लोणंद - (प्रतिनिधी )


वाघोशी तालुका खंडाळा येथील श्री बापूराव जयराम धायगुडे वय वर्षे 54 यांचे अल्प आजाराने  पनवेल , येथील  रुग्णालयात उपचार दरम्यान निधन झाले.


 बापूराव जयराम धायगुडे  हे नायगाव मुंबई येथे  सशस्त्र पोलीस दलात हवालदार पदावर नोकरीत होते.


14 एप्रिल रोजी मुंबई येथे  किडनी विकाराने  निधन  झाले. 
त्यांचा मृतदेह वाघोशी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथे आज दि.14  येणार असून सातारा पोलीस दलातर्फे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
 त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली असा परिवार आहे.