मेढयात मिळणार गरजूना शिवभोजन थाळी


मेढा(प्रतिनिधी):-जमावबंदी, संचारबंदी लागू केल्या मुळे गोर गरीब तसेच रोजंदारी वर काम करणाऱ्या कष्टकरी लोकांच्या पोटाला दोन वेळचे अन्न मिळत नसल्याने हाल होत असुन याची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानव्ये जावली तालुक्यातील मेढा येथे हॉटेल श्रीराम येथे जावली चे तहसीलदार शरद पाटिल यांच्या हस्ते शिवभोजन थाळी ची सुरुवात करण्यात आली.
         तालुक्यातील कुडाळ केळघर येथे पुढील काळात शिवभोजन थाळी सुरु करणार असल्याचे तहसीलदार शरद पाटील यांनी सांगितले,हॉटेल श्रीराम येथे रोज ११ ते ३ या वेळेत १०० लोकांना शिवभोजन थाळी चा लाभ घेता येणार आहे,शिवभोजन थाळीची सुरुवात होताच ३० लोकांनी याचा लाभ घेतला असून या शुभारंभ प्रसंगी नायब तहसीलदार सुनील मुनाळे,मेढा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अमोल पवार उपस्थित होते