"काशिनाथ शेळके पाटील यांच्याकडून पाडळी ता. खंडाळा येथील गोपाळ समाजाला जीवनावश्यक वस्तूचे वाटप"
लोणंद दि.
(दिलीप वाघमारे याच्याकडून )
संचारबंदी लागू असल्यामुळे गोरगरिबांचे उपासमार सुरू झाले आहेत.
पाडळी तालुका खंडाळा येथील गरीब जनतेसाठी लिंबोडी ता. खंडाळा येथील प्रगतशील शेतकरी श्री काशिनाथ शेळके पाटील यांच्या मार्फत पाडळी ता. खंडाळा येथील गोपाळ समाजातीलक्ष लोकांना तीन क्विंटल धान्य व जीवनावश्यक वस्तू, गोडेतेल,साबण, ज्वारी,बाजरी,आधी जीवनावश्यक वस्तू तलाठी व सर्कल यांच्या हस्ते काशिनाथ शेळके पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाटण्यात आले.
नंदकुमार शेळके पाटील, प्रशांत खरात, कुंडलिका शेळके पाटील व गावचे तलाठी सर्कल इतर कार्यकर्ते, पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.