म्हसवड :
विरळी ता. माण या गावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. याबाबत अनेक लोक अफवा पसरवित आहेत. पण जनतेने घाबरून जाऊ नये..
आम्ही ग्रामस्थ पुर्ण पणे याबाबत काळजी घेत आहोत. जनतेने अफवांना बळी पडु नये. असे आवाहन विरळी गावचे सरपंच प्रशांत गोरड यांनी केले आहे.
प्रशांत गोरड सरपंच विरळी वस्तुस्थिती मांडतांना माणदेशी न्युज शी बोलताना म्हणाले.,
माझ्या विरळी ता. माण. गावामध्ये बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांना क्वारंनटाइन करण्यात आले होते. क्वारंनटाइन केलेली सगळी लोक गावाच्या बाहेर शाळेमध्ये ठेवले होते. यामध्ये ६ जण अहमदाबाद येथून परवानगी घेऊन आले होते.
सदर व्यक्ती ज्या वाहनामध्ये प्रवास करून आले होती. त्याच वाहनातील साळशिंगे येथील एक महिला कोरोना बाधीत आढळली .
त्यावरून संशयीत म्हणून दहिवडी या ठिकाणी शिफ्ट करण्यात आले. व त्यांची कोरोना चाचणी केली असता १ व्यक्ती कोरोना पॉझीटीव्ह आली व उर्वरीत व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या.
मी माझ्या समिती मधील सदस्यांच्या सहकार्याने अतीशय उत्तम प्रकारचे विलगीकरण कक्षाचे नियोजन केले आहे..
मी आपल्या सोबत संवाद साधण्याचे कारण गेल्या दोन दिवसापासून संपुर्ण तालुक्यामध्ये माझ्या बद्दल व आमच्या पोलीस पाटील यांच्याबद्दल एक अफवा पसरली आहे की क्वारंनटाइन केलेल्या व्यक्ती सोबत आम्ही कोरोना विलगीकरन कक्षावर दारू व मटणाच्या पार्टी केली आहे.
तसेच आम्हाला कोरनटाइन(उचलले) केले आहे अशा प्रकारच्या अफवा माझ्या हितचिंतकांनी पसरवल्या आहेत.
या अफवांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. मी सध्या गावा मधेच आपल्या प्रमाणेच माझी जबाबदारी पार पाडत आहे..
मी लवकरच माझ्या गावाला या संकटातून बाहेर काढण्याचा प्रामाणीक प्रयत्न करीत आहे.
या संकटातून बाहेर पडल्या नंतर सबंधितावर मानहानी व आब्रु नुकसानीचा दावा दाखल करनार आहे .असे ही त्यांनी सांगितले.
आपल्या सर्वांचे आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझ्यावर कितीही संकटे आले तरी डगमगणार नाहीं.मी माझ्या कर्तव्यामध्ये कुठेही कमी पडणार नाही. काळजी नसावी..
मला कल्पना आहे की माझ्या प्रमाणेच आपण देखील आपल्या गावामध्ये लॉकडाऊन मध्ये उत्तम काम करीत आहात. काम करत असताना कदाचीत माझ्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला होत असेल. *परंतु खचुन जाऊ नका. हे युद्ध आपल्याला जिंकायच आहे.आणी कोरोना हरणार आहे आणी आपण जिंकणार आहोत.
कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. असे ते म्हणाले आहेत.